इन्सुली-कोंडवाडा येथे कदंबा बस व कारची धडक; कारचे मोठे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली-कोंडवाडा येथे आज कदंबा बस आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पणजीहून सावंतवाडी मार्गे बेळगावकडे जाणाऱ्या कदंबा बसला बेळगावहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. हा अपघात इन्सुली-कोंडवाडा परिसरात घडला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!