कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत, जिल्ह्यातील सर्वच शिक्षक संघटना व शिक्षक समस्याग्रस्त असल्याने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर नेहमी चिंतेत होते, तत्कालीन शिक्षणाधिकारी यांची उचल बांगडी केल्यानंतर कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता दिनांक 08.06.2026 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दालनामध्ये बैठक बोलावून जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना आपल्या समस्या घेऊन बोलावले होते, जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या नवीन आलेले शिक्षणाधिकारी मा. श्री. किंजवडेकर साहेब यांना यादी दिली होती त्या यादीनुसार शिक्षणाधिकारी श्री किंजवडेकर सर यांनी खालील शिक्षकांच्या तात्काळ मान्यता दिल्या.
1) संध्या पंढरी मुणगेकर मिलिग्रीस हायस्कूल सावंतवाडी यांची पर्यवेक्षक पदाची मान्यता देण्यात आली.
2) तोरस्कर राजाराम संभाजी कुडाळ हायस्कूल कुडाळ यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव मान्य करण्यात आला.
3) दत्त नारायण प्रभू खानोलकर मिली ग्रीस हायस्कूल सावंतवाडी यांची वैयक्तिक मान्यता देण्यात आली.
4) शर्वरी चंद्रकांत जाधव अनुकंपा नियुक्त सहाय्यक शिक्षक महात्मा गांधी विद्यामंदिर सातोर्डे सावंतवाडी यांची मान्यता देण्यात आली.
5) कोंडस्कर वैभव पांडुरंग कुडाळ हायस्कूल कुडाळ यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मान्य करण्यात आला.
6) विनोद शिवाजी चौगुले शिरगाव हायस्कूल शिरगाव तालुका देवगड यांचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मान्य करण्यात आला.
7) श्रध्दा नितिन पराडकर कलबिस्त न्यू इंग्लिश स्कूल कलबिस्त सावंतवाडी वरिष्ठ वेतन श्रेणी मान्यता देण्यात आली
8) अरविंदराव राणे विद्यालय वैभववाडी तालुका वैभववाडी या शाळेचे रोस्टर तपासणी करिता शिफारस पत्र घेण्यात आले.
असून उर्वरित शिक्षकांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक चांगले काम करण्याचे आश्वासन माननीय शिक्षणाधिकारी यांनी केले, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक चांगले सक्षम अधिकारी आले असून शिक्षकांच्या समस्या सुटतील असा विश्वास आमदार ज्ञानेश्वर मात्र सरांनी व्यक्त केला. या वेळी शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांनी तत्परतेने शिक्षकांचे प्रश्न निकाली काढण्याचे काम केले. याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे सर, सचिव घावरे सर, उपाध्यक्ष रवींद्र सावंत, मुख्याध्यापक संघ मार्गदर्शक, गुरुदास कुसगावकर सर, सुभाष खरात सर, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर सर, कणकवली तालुका अध्यक्ष शरद चोडणकर, सावंत सर, भाजपा शिक्षक आघाडीचे सुरेश चौकेकर सर, वेतोरे हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर, शिकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आप्पा लांबोरे, शिव छत्रपती शिक्षक संघटनेचे सतीश तवटे, राजेश पाटकर, राहुल कदम, विजया सावंत, योगेश चव्हाण, सत्यवान परब, साईप्रसाद वेंगुर्लेकर, रमेश कविटकर, चैतन्य सुकी, शकलेन पटेल, राजाराम तोरसकर, दिवाकर पवार, विनोद चौगुले, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












