गॅस सिलेंडर ४ दिवस आधी बुक करा, अन्यथा ७ दिवसांनी बुकिंग रद्द – गॅस डीलर्स असोसिएशनचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बीपीसीएल, आयओसीएल आणि एचपीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या एलपीजी गॅस वितरकांनी सिंधुदुर्ग जिल्हा गॅस डीलर्स असोसिएशनच्या वतीने सर्व गॅस ग्राहकांना संघटनेचे खजीनदार नंदकिशोर करावडे यानी पत्रकार परीषदेतुन आवाहन केले आहे. तर नागपूरच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओटीपीविरहित गॅस सिलेंडरची सेवा द्यावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी याच्याकडे केली असल्याचे असोसिएशनचे सचिव नंदकीशोर करावडे यांनी सांगितले.
युध्दजन्यपरिस्थितीमुळे गँससिलेंडर मिळणे कठीण होऊन बसल्याने ओटीपी शिवाय गॅस मिळत नाही .त्यामुळे ग्राहक आणि डीलर मध्ये खटके उडतात,मारामारी होतात. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्पस्ट केली.
यावेळीनंदन वेंगुर्लेकर,सिध्दांत सावंत,अनुप तेली, रघुनाथ चव्हाण, नारायण गवस,सचिन पुजारे उपस्थित होते.
असे आहे आवाहन
असोसिएशनने म्हटले आहे की, ग्राहकांनी गॅस सिलेंडर संपण्यापूर्वी किमान ४ दिवस आधी आगाऊ बुकिंग करणे गरजेचे आहे. गावातील ग्राहकांनी गाडी रूटप्रमाणे ठरलेल्या दिवशी येण्याआधी ४ दिवस आधी बुकिंग करावे व त्याच दिवशी भरलेला सिलेंडर घ्यावा.
७ दिवसांनी बुकिंग रद्द होणार
शासनाच्या व कंपनीच्या नवीन निकषानुसार गॅस बुकिंग केल्यानंतर ७ दिवसांत सिलेंडर घेतला नाही तर सदरचे बुकिंग रद्द होईल. आणि ओटीपी कालबाह्य होईल. मात्र बुकिंग रद्द झाल्यानंतर ग्राहक पुन्हा त्वरित नव्याने बुकिंग करू शकतात व नवीन ओटीपी मिळवू शकतात. यामुळे गरजू ग्राहकांना सिलेंडर लवकर मिळण्यास मदत होईल.
१५ दिवसांची मागणी
सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थिती, बुकिंगमधील तांत्रिक अडचणी व खेडोपाडी राहणाऱ्या ग्राहकांचा विचार करता कंपनीला बुकिंगची मुदत ७ दिवसांऐवजी १५ दिवसांपर्यंत वाढवण्याची विनंती असोसिएशनने केली आहे.
ग्राहकांच्या सहकार्याबद्दल आभार
असोसिएशनने म्हटले आहे की, “पूर परिस्थिती, कोरोना काळ तसेच सध्याची युद्धजन्य परिस्थिती यामध्ये ग्राहकांनी जिल्ह्यातील सर्व वितरकांना जे सहकार्य केले, ते आमच्यासाठी अनमोल आहे. सध्या होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पूर्वीप्रमाणेच ग्राहकांनी सहकार्य करावे,” अशी विनंती तिन्ही कंपन्यांच्या वितरकांनी केली आहे.जिल्ह्यात ३ लाखापेक्षा जास्त गँस ग्राहक आहे ५० ते ६० टक्के ग्रामीण भागातील आहेत. असे नंदन वेंगुर्लेकर यानी सांगितले.












