भारतीय ज्यूदो महासंघाच्या कोषाध्यक्षपदी शैलेश टिळक यांची निवड

तळेरे (प्रतिनिधी) : ज्यूदो फेडरेशन ऑफ इंडिया या भारतातील ज्यूदो खेळातील सर्वोच्च संघटनेच्या कोषाध्यक्षपदी महाराष्ट्रच्या शैलेश टिळक यांची बहुमताने निवड करण्यांत आली. दिल्ली येथे ०८ जून रोजी आयोजित या निवडणुकीत टिळक यांना ३७ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी केरळ ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष श्रीकुमार याना २३ मते प्राप्त झाली. शैलेश टिळक हे महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव आहेत.

नामांकन करण्यांत आले होते. शैलेश टिळक यांची आसामच्या बानी बात्रा दास यांना मिळालेल्या ३९ मताखालोखाल ३७ मतसंख्या आहे. ज्यूदो महासंघावरील चार वर्षांपासून लागू असलेले ‘प्रशासकीय राज’ या निवडणुकीमुळे संपुष्टात येवून लोकशाही पद्धतीने झालेल्या निवडणुकीतून राज्य ज्यूदो संघटनांच्या प्रतिनिधींचे प्रशासन स्थापन झाले आहे. या नवनिर्वाचित सभासदांवर आता देशामध्ये लागू झालेल्या क्रीडा विधेयकानुसार महासंघाची घटना तयार करणे हे प्राथमिक कार्य असणार आहे. याशिवाय लगेचच आयोजित होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स आणि आशियाई स्पर्धेसाठी संघ निवड प्रक्रिया, लागू झालेल्या नव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा नियमांची ओळख करून देवून तदनुसार वयोगटानुसार स्पर्धा आयोजित करणे आदी जबाबदाऱ्या तातडीने स्वीकाराव्या लागणार आहेत.

नव्या कार्यकारीणीमध्ये फेडरेशनचे अध्यक्ष मुकेशकुमार (मध्य प्रदेश) महासचिव बानी बात्रा दास (आसाम) हे प्रमुख पदाधिकारी असून कार्यकारीणीमध्ये चार उपाध्यक्ष, चार सहसचिव आणि अकरा सभासद आहेत याशिवाय सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या समितीतील एक पुरुष आणि एक महिला अशा दोघाजणांचा समावेश आहे.

भारतीय ज्यूदो महासंघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
प्रमुख पदाधिकारी
अध्यक्ष -मुकेश कुमार (मध्य प्रदेश)
महासचिव- बानी बात्रा दास (आसाम),
कोषाध्यक्ष- शैलेश टिळक (महाराष्ट्र),
उपाध्यक्ष-रॉनी रोजन्गावार्त (मिझोराम),मनीषा मल्होत्रा (चंडिगड),
आयेशा मुनावर (उत्तर प्रदेश),
देवीश्री कदम – पाटील (कर्नाटक),
सहसचिव व्यंकट नामीशेट्टी (आंध्र प्रदेश),रेणू काजला (हरियाणा),विघ्नेश भक्ता (गोवा)
विकास गुप्ता (जम्मू काश्मीर)नैपुण्य प्राप्त सर्वोकृष्ट खेळाडू गट- अक्रम शहा आणि सुशीला देवी

बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर महाराष्ट्राचे राष्ट्रीय स्तरावरील समितीमध्ये प्रातिनिधित्व शैलेश टिळक यांच्या माध्यमातून होणार आहे. टिळक यांच्या नियुक्तीबद्दल महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ आणि महासचिव संजय शेटे यांनी अभिनंदन केले आहे. यासह महाराष्ट्र ज्यूदो संघटनेचे प्रमुख आश्रयदाते पुनित बालन यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र ज्यूदो संघटनेच्या वतीने सर्वसामान्य खेळाडू आणि पदाधिकारी यांनी टिळक यांच्या नियुक्तीबद्दल संतोष व्यक्त करून अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!