सिंधुदुर्ग भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा अहवाल आमदार योगेशसागर यांच्याकडे सुपूर्द

कोकण – ठाणे विभागामध्ये प्रशिक्षण अभियानात सिंधुदुर्ग भाजपा अव्वल

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग मालवण -चौके येथील नॅनीज ग्रॅड रिसोर्ट येथे दिनांक २३ व २४ मे या कालावधीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा अहवाल मुंबई येथे भाजपा च्या प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सुपूर्द केला .

कोकण – ठाणे विभागात सिंधुदुर्ग अंव्वल —
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत संपुर्ण राज्याच्या मंडल व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कोकण – ठाणे विभागातील एकुण १८७ मंडलांत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९५ % उपस्थिती व नोंदणी शुल्क भरून विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलातील प्रशिक्षण वर्गात १११५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला . तसेच जिल्हा प्रशिक्षण वर्गात अपेक्षित १४३ पदाधिकाऱ्यांपैकी १३६ जणांनी निवासी सहभाग नोंदवला व ऑनलाईन नोंदणी शुल्क जमा केले .

या जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गास प्रदेश भाजपाकडून प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, आमदार प्रशांत ठाकूर,अभियानाच्या प्रदेश सहसंयोजीका प्रा.वर्षाताई भोसले, विधान परिषद आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, रवींद्र साठे, अभिजीतजी सामंत, जयंत जाधव, सोशल मिडीयाचे सागर भदये, मुंबई भाजप चे सरचिटणीस राजेश शिरवाडकर यांचे वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभले. तसेच पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले .

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, सहसंयोजक प्रमोद रावराणे,संध्या तेरसे व श्रीकृष्ण परब या संयोजक टीमने विशेष मेहनत घेऊन जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी झाला.

error: Content is protected !!