नाधवडे कोकिसरे दरम्यान 5 किमी लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार…..!

कणकवली( प्रतिनिधी) : मुंबई -तळेरे ते गगनबावडा घाट पर्यंत रस्त्याच्या 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून त्यातील पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण हे नाधवडे ते कोकिसरे दरम्यान होणार आहे. बाकी 16 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम हे घाट रस्त्याचे होणार आहे,अशी माहिती हाय वे ऑथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी बोलताना दिले. तळेरे पासून 6 किमी म्हणजे नाधवडे पासून हे काम सुरु होईल आणि त्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर कोकिसरे पर्यंत काम पूर्ण होईल.हा पॅच कायम चर्चेत राहिला असून त्याच्या दुरुस्तीला प्राधान्य दिलेले आहे.

   तळेरे ते करूळ घाट रस्ता 30 किलो मीटर लांबीचा रस्ता असून हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अखत्यारीत येतो.सिंधुदुर्ग जिह्यातील एकूण 16 किमी लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे.आणि गगनबावडा हद्दीतील रस्त्याचे 5 किमी लांबीचे काँक्रीटीकरण होणार आहे.असं एकूण 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम होणार आहे.करूळ चेक नाका पासून पुढे सिंधुदुर्गातील घाट हद्दीपर्यंत हे काम 11 किलोमीटर लांबीचे काम होईल.तर पुढे गगनबावडा घाट पूर्ण हद्दीपर्यंत 5 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होईल.असा एकूण घाट मार्ग 16 किलोमीटर असून त्याचे पहिल्या टप्यात पूर्ण काम होईल.या सर्व कामा साठी 249 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या रस्त्याचे 30 फूट रुंदीचे सिमेंट काँक्रिटीकरण आहे.तर मॉर्थच्या नियमानुसार डिड मीटर फुटपाथ होणार आहेत सप्टेंबर पासून काम पूर्ण व्हायला 18 महिने लागणार आहेत.तळेरे ते करूळ चेक नाका या उर्वरित 14 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप मंजूर झालेले नाही.पुढील अर्थसंकल्पात प्रस्तावित केले जाणार आहे.हे काम भवानी कन्ट्रक्शन कंपनी कोल्हापूर यांना मिळाले आहे. अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
error: Content is protected !!