मांडवी,कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसला झाराप थांबा मिळावा!

मालवण (प्रतिनिधी) : मांडवी,कोकणकन्या, जनशताब्दी एक्सप्रेसना झाराप रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा अशी मागणी वेंगुर्ले आडेली येथील गजानन चं. मुंडये यांनी केली आहे. सदर स्टेशन वर थांबा मिळावा ही मागणी पूर्वी पासून आहे. परंतु या कडे का दुर्लक्ष होत आहे. या स्थानकवर केवळ दिवा गाडीचं थांबते. वेंगुर्ले,वेतोरे,माणगाव, साळगाव, आडेली,आकेरी,मठ, ईत्यादि सुमारे ३० हजार लोकसंख्या असलेल्या गावातील नागरीकाना कुडाळ अथवा सावंतवाडी या रेल्वे स्टेशनवर उतरुन आपल्या गावापर्यंत अधिक भाडे आकारुन जावे लागते. जे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. विनंती अर्ज करूनही रेलवे प्रशासन या अडचणीकड़े दुर्लक्ष करत आहे. वरील तीन मेल एक्सप्रेस ” झाराप ” या रेलवे स्टेशनवर थांबवुन आमचे प्रवाशी जीवन आर्थीक बाबतीतही सुसह्य करावे अशी मागणी गजानन चं. मुंडये यांनी केली आहे.

error: Content is protected !!