Category क्राईम

वृद्धेच्या खून प्रकरणी गावातीलच संशयित ताब्यात

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी उघड झाली होती. . या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मृत वृद्धेचे नाव जयश्री दत्ताराम साटम असून तिच्या मानेवर , छातीवर हत्याराने वार…

वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे वयोवृद्ध महिलेचा घातपात

मंगळवारी रात्री घटली घटना, श्वानपथकासह पोलिस घटनास्थळी दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात एक धक्कादायक घटना घडली. सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची अज्ञातांनी धारधार हत्याराने वार करून हत्या केली आहे.जयश्री साटम असं या महिलेच नाव असून तिच्या…

ओरोस मध्ये युवतीचा गळफास घेत आत्महत्या

यूपीएससी चा अभ्यास करत होती मृत युवती सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील ओरोस भवानी मंदिर परिसरातील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त तिची आई…

कणकवली लगत हायवेवरील गावात युवतीवर अत्याचार ; युवती गर्भवती ?

प्रकरण दाबण्याचा खटाटोप ? कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील हायवेवर असणाऱ्या एका गावात एका युवतीवर सामूहिक शारीरिक अत्याचार करण्यात आले असून त्यातून पीडित युवती गर्भवती झाल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. गर्भपात करण्यासाठी पीडित युवतीला तालुक्याच्या ठिकाणी एका खाजगी…

ठकसेन बिल्डर जोडी ला अटक ; अनेकांची लाखोंची फसवणूक

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात जानवली येथे अंबर प्रकल्पांतर्गत २९ बंगले बांधले जाणार असल्याचे आमिष दाखवत शामल मंगेश तळदेवकर (रा.जानवली) यांची १४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघाजणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी संशयित आरोपींचा सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन फेटाळला होता.…

गोवा बनावटीच्या अवैध दारू तस्करी गुन्ह्यात बेळगाव च्या तिन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : तळेरे वैभववाडी रस्त्यावर गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यातील आरोपी याळप्पा बाळाप्पा लोकूर, संतोष पवार, शंकर बसवंत देशनुर ( तिघेही रा. बेळगाव कर्नाटक ) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा प्रधान…

कुंटणखाना चालवणाऱ्या संतोष लुडबे चा जामीन फेटाळला

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सवंतवाडी तालुक्यात आजगाव येथे अन्नपूर्णा सेक्स वर्कर वेल्फेअर च्या नावाखाली कुंटणखाना चालविणाऱ्या संतोष लुडबे चा जामीन अर्ज प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी आज फेटाळला. सरकार पक्षाच्या…

देवगड पोलिसांकडून शिरगाव येथे मटका बुकीवर छापा

देवगड (प्रतिनिधी): देवगड पोलिसांनी तालुक्यातील शिरगाव बाजारपेठेत मुंबई मटका घेताना दीपक सुनील गोडे ( वय 25, रा.चंदन हॉटेलसमोर,धोपटेवाडी शिरगाव ) याच्यावर 19 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी कारवाई केली.त्याच्याकडून रोख रु 660 व मटक्याचे पावती पुस्तक व अन्य…

देवगड तालुक्यात स्थानिक पोलिस आणि एलसीबी कडून गोवा बनावटीची दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व देवगड पोलिसांच्या धडक कारवाईत तोरसाळे येथे 24 हजार रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाई 18 व 19 जुलै दोन दिवसामध्ये करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि…

पोक्सो सारख्या गुन्ह्याकडे सावंतवाडी पोलिसांचे दुर्लक्ष ?

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उठवला आवाज सावंतवाडी (प्रतिनिधी): तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला आहे. यात तिघांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधितांवर संशयितांसह हा प्रकार पाठिशी घालणाऱ्याच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आज येथील पोलीस…

error: Content is protected !!