राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांची प्रमुख उपस्थिती
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील ज्युनिअर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ नुकताच राजापूर तहसीलदार विकास गंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंद्रकांत परिसा रायबगाकर सभागृहात संपन्न झाला. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाल प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, प्रमुख पाहुण्या पत्रकार कु. अस्मिता गिडाळे (माजी विद्यार्थिनी), ५८ महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग चे सुभेदार मेजर कुलदीपकर सुधाकर गोविंदराव, यश कम्प्युटर खारेपाटणचे संचालक मंगेश गुरव, सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ.ए.डी.कांबळे, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.तर उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रशालेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निम्मित जमलेल्या ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इयत्ता बारावीच्या विविध विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक व प्रशालेविषयी कृतज्ञतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त झाली. पुढील आयुष्यात प्रशालेमध्ये दिलेली शिकवण उपयोगी येईल अशा प्रकारची मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी आपल्या मनोगतातून जीवनात यशस्वी होण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने अभ्यास करा.कष्ट व मेहनत करून जीवनात यशस्वी व्हा. असे विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच पत्रकार कुमारी अस्मिता गिडाळे यांनी आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा असा सल्ला दिला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरसाळे यांनी केले व आभार वरूणकर यांनी केले.















