कणकवली (प्रतिनिधी) : मूळ राजापूर येथील व सध्या कणकवली स्वयंभू मंदिर नजीक राहणारे तसेच समर्थ साऊंडचे मालक दिनेश उर्फ बापू रमाकांत डंबे 48 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बापू डंबे हे सिंधुदुर्ग मंडप लाईट साऊंड असोसिएशनचे अध्यक्ष होते. बापू डंबे यांना विविध सांस्कृतिक सांस्कृतिक कला आणि नाट्य क्षेत्रातील साऊंड सिस्टिम ची तांत्रिक माहिती होती. तसेच ते उत्कृष्ट कॅरमपटू ही होते. दिनेश डंबे यांच्या पश्चात पत्नी मुलगा भाऊ-बहीण वहिनी पुतण्या असा परिवार आहे.
कणकवलीतील समर्थ साऊंडचे मालक दिनेश डंबे यांचे निधन












