वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे सिद्धाचीवाडी येथील बाबुराव पुंडलिक रावराणे वय ६८ यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मुंबई येथे निधन झाले. मुंबई पोलीस दलात ३५ वर्षे सेवा करून ते दहा वर्षांपूर्वी निवृत्त झाले होते. काही दिवसापूर्वी ते देव कार्यासाठी आपल्या आचिर्णे येथील घरी आले होते. वेळप्रसंगी अनेकांच्या मदतीला धावून जाऊन ते मदत करीत असत त्यांच्या या परोपकारी वृत्तीने ते सर्वत्र परिचित होते.त्यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त गावात समाजात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी सून, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय स्टेट बँकचे सेवानिवृत्त अधिकारी बळीराम रावराणे यांचे ते बंधू होते.
आचिर्णे येथील बाबुराव रावराणे यांचे हृदयविकाराने निधन












