धामापूर मोगरणे येथे राहत्या घरावर दरड कोसळून नुकसान

पडवीत बांधलेली गाय गंभीर जखमी : सुदैवाने बचावली

चौके (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस सुरु असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला असून, काल गुरुवार दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान धामापूर मोगरणे जाधववाडी येथील श्री जयंत सदानंद ठोंबरे यांच्या राहत्या घरावर दरड कोसळून घराची मागील पडवीच्या भिंती आणि कौलरू छप्पर पूर्णपणे कोसळून ठोंबरे यांचे सुमारे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

दरम्यान देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय दुर्घटना स्थळी पाहण्यास मिळाला तो म्हणजे ज्या वेळी दरड कोसळून घराची भिंत आणि छप्पर कोसळले त्यावेळी त्या पडवीमध्ये ठोंबरे यांची गाय बांधलेली होती. सुदैवाने या दुर्घटनेत गायीचा जीव वाचला असून तिला मात्र गंभीर दुखापत झाली आहे.सदर दुर्घटनेची माहिती मिळताच धामापूर सरपंच सौ. मानसी परब आणि श्री. महेश परब यांनी दुर्घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व या दुर्घटनेची माहिती दुरध्वनी वरून शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांना दिली. यावर दत्ता सामंत यांनी तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले असून आमदार निलेश राणे यांनी लवकरात लवकर ठोंबरे यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन सरपंच मानसी परब यांना दिले. अशी माहिती महेश परब यांनी दिली.

error: Content is protected !!