चौके सरपंच पी. के.चौकेकर बांधकाम विभागाकडे केली त्वरित गटार खोदाईची मागणी
चौके (प्रतिनिधी) : चौके ते कुडाळ रस्त्यावरील चौके समाज मंदिर ते देवलीला जाणाऱ्या रस्त्यावर गटार खोदाई न केल्यामुळे पावसाळ्यापूर्वी अवकाळी पडलेल्या पावसामुळे पाणी तुंबून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने वाहन चालक आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे ही बाब चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण कार्यालयाच्या निदर्शनास आणून त्वरित गटार खोदाई करण्याची मागणी केली आहे.
दोन महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने चौके कुडाळ आणि चौके कसाल रस्त्याच्या गटाराची खोदाई करण्यात यावी तसेच रस्त्यावरील मोऱ्यांची सफाई करावी तसेच झाडांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत त्या तोडून घेण्याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता श्रीमती लोखंडे यांनी पहाणी करून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले होते. मात्र मे महिना संपत आला तरी पावसाळ्यापूर्वी ची कामे केली नाहीत आणि अचानक अवकाळी पाऊस सुरू झाल्याने गटारे तुंबून वाहन चालकांना आणि पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे .
तसेच मालवण कसाल रस्तावरील चौके नाका ते दीपक चौकेकर यांच्या घरापर्यंत गटार खोदाई न केल्यामुळे दीपक चौकेकर यांच्या घरात गटाराचे पाणी शिरले होते तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घ्यावी अशी मागणी सरपंच पी. के. चौकेकर यांनी केली आहे.












