डॅफोडील्स रिसॉर्ट आचरा येथे आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता डॅफोडील्स रिसॉर्ट आचरे या ठिकाणी आयोजित केली आहे. सदर सभेला सर्व सदस्यांनी वेळीच उपस्थित राहावे असे आवाहन सुरेश शा. ठाकूर (अध्यक्ष) गुरुजी आणि अनिरुद्ध आचरेकर (कार्यवाह) कोमसाप मालवण यांनी केले आहे.
सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन, जमा खर्च अहवाल वाचन (2024-25), नवीन कार्यकारणी निवड 2025 ते 28चालू वर्षीच्या कार्यक्रमाचे नियोजन आदी विषयांवर चर्चा होणार आहे सभेला मार्गदर्शन करण्यासाठी मंगेश मस्के (जिल्हाध्यक्ष) तसेच रुजारिओ पिंटो (केंद्रीय प्रतिनिधी) उपस्थित राहणार आहेत तरी सदर सभेला सर्वांनी वेळीच उपस्थित राहावे, असे आवाहन सुरेश ठाकूर यांनी केले आहे.












