अविनाश शिरवलकर यांच्या सौजन्याने शिरवल येथे २६ मे रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

शिरवल ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा

कणकवली (प्रतिनिधी) : समाजसेवा हीच ईश्वरसेवा हे बिद्र अंगिकारुन शिरवल ग्रामस्थांच्या आणि गावच्या जनसेवेसाठी शिरवल गावचे सुपुत्र तथा समाजसेवक श्री अविनाश आत्माराम शिरवलकर यांनी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे.या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिरवल ग्रामपंचायत येथे सोमवार २६ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

Wanhua International (1) Pvt Ltd through CSR Initiative (Mumbai) यांच्या सौजन्याने आणि समाजसेवक अविनाश आत्माराम शिरवलकर यांच्या प्रयत्नातून मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा होणार आहे.लोकापर्ण सोहळ्यानिमित्त शिरवल ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले असून मोफत औषधे वाटप करण्यात येणार आहे.शिरवल ग्रामस्थांनी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहुन मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन समाजसेवक श्री. अविनाश आत्माराम शिरवलकर यांनी केले आहे.

error: Content is protected !!