मरावे परी अवयवरुपी उरावे

खारेपाटण मधील वीणा ब्रम्हदंडे यांचे अकाली निधन ; नातेवाईकांनी केले अवयव दान

खारेपाटण (प्रतिनिधी) : प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था खारेपाटण या संस्थेचे व्हॉईस चेअरमन श्री राजेंद्र गणपत ब्रम्हदंडे यांच्या पत्नी सौ वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे राहणार खारेपाटण हायवे यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी आज गुरवार दि.२९/५/२०२५ रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती मुलगा,मुलगी नातवंडे असा परिवार आहे.

मयत वीणा राजेंद्र ब्रम्हदंडे या येथील जैन समाज मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी मृत व्यक्तीचे अवयव दान करून समाजापुढे एक चागला आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!