कट्टा येथे आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मिता कम्प्युटर कट्टा इंस्टिट्यूटच्यावतीने आयोजन

चौके (प्रतिनिधी) : आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्मिता कम्प्युटर इन्स्टिटयूट कट्टा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गुरामवाडी ग्रामपंचायत कट्टाचे सरपंच शेखर पेणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्मिता कम्प्युटर एज्युकेशनच्या संचालिका श्रद्धा नाईक, आभाळमायाचे मार्गदर्शक सुनील नाईक, परमानंद वेंगुर्लेकर, कट्टाचे आरोग्य सेवक आदेश घाडी, आरोग्य सेविका ज्योती पाटकर, मीरा तावडे टेलिमेडीसीन आणि स्मिता कम्प्युटरचे विद्यार्थी उपस्थित होते.

या आरोग्य शिबिरात कट्टा परिसरातील १०१ गरजू लोकांची रक्त तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम, हिमोग्लोबीन, CBC, डायबेटिस, Thyroid function Test करण्यात आल्या. यावेळी २५ लोकांनी ECG रिपोर्ट चा लाभ घेतला. उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच पेणकर यांनी स्मिता कम्प्युटर एज्युकेशनकडून समाजोपयोगी कार्यक्रम राबवून समाजातील लोकांना, मुलांना ही तपासणी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या.
या शिबिर प्रसंगी आभाळमाया ग्रुपचे सदस्य डॉ. प्रथमेश वालावलकर, वराड ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष छोटू ढोलम, ऍड. प्रदीप मीठबावकर, रामचंद्र आंबेरकर, राहुल डगरे, वराडकर हायस्कूलचे वाजंत्री सर, भाट सर, कानुरकर सर, घनश्याम राणे, शशिकांत परब, दिनेश राऊळ, बाळा चव्हाण, गौतमेश्वर नाईक, उमेश मिरजकर, हरी मोरजकर, दीपिका वेंगुर्लेकर, प्रतीक्षा परब, कांचन ढोलम, सीमा पडते, मोरजकर मॅडम, हंसू रावले शिवाय परिसरातील इतरही महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तु देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मिता कम्प्युटर आणि आभाळमायाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आरोग्य कर्मचारी प्रगती कसालकर स्टाफ नर्स, रंजना फाटक HLL लॅब टेक्निशियन, आशा सेविका मृण्मयी ढोलम, आ. मुख्य प्रवर्तक नाईक मॅडम यांचे सहाय्य लाभले. त्याच प्रमाणे स्मिता कम्प्युटरच्या आणि आभाळमायाचे रक्तदाती सविता शिरोडकर, सानिका गावडे, ओंकार वराडकर यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्य लाभले. नेहमीच आपल्या परिसरातील लोकांसाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व स्तरातून स्मिता कम्प्युटरचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!