पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर

भाजपा फोंडाघाट विभागाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढीदिवसाचे औचित्य साधून भाजपा फोंडाघाट विभागाच्या वतीने रविवार 22 जून रोजी  सकाळी 9 : 30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राधाकृष्ण मंगल कार्यालय फोंडाघाट येथे मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या मोफत महाआरोग्य शिबिरात हर्निया , मुतखडे, पित्ताशयातील खडे,अल्सर, प्रोस्टेट ग्रंथी, कान नाक घसा शस्त्रक्रिया,अपेंडिक्स, टॉन्सिल्स, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया,थायरॉईड, चरबीच्या गाठी,महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया,मूळव्याध, मोतीबिंदू शस्त्रक्रिया,इंप्लान्ट रिमूव्हर आदी तपासणी मोफत केल्या जाणार आहेत.या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी राजन चिके मोबा. 9422381594 , दर्शना पेडणेकर मोबा. 8691866857,मिहीर मराठे मोबा.9284075387, सचिन राणे मोबा. 9579383676, संतोष कानडे मोबा. 9422381996, अजय रावराणे मोबा. 8379993663 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!