पालकमंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांची केराची टोपली

माजी आमदार परशुराम उपरकर यांची टीका

कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री आणि त्यांच्या राणे कुटुंबाला कोणीच अधिकारी सिंधुदुर्गात जुमानत नाहीत. जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्याचे विरोधी पक्षनेते सांगत होतेच आता पालकमंत्र्यांचे बंधू आमदार निलेश राणेंनीही जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असून त्याला पोलीस संरक्षण असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात अवैध धंदे बंद करण्याच्या पालकमंत्री नितेश राणेंच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी शिंपी यांच्यावर कारवाई बद्दल विधिमंडळात विषय येऊनही उलट श्रीमती शिंपी याना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आहे. कणकवली तहसीलदार भ्रष्ट कारभार करत असून आता पालकमंत्री कणकवली येथील तहसीलदारांना देवगड तहसीलदार पदी बदली देण्यासाठी धडपड करत आहेत. जगातील एकमेव शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या किल्ले सिंधुदुर्ग मधील दिवाबत्ती साठी वार्षिक 1 लाख तर अफजलखानच्या कबरीला अडीच लाख शासन देते. हिंदूंचा मसीहा म्हणवून घेणारे मंत्री नितेश राणे दुर्लक्ष करतात. पालकमंत्री नितेश राणे केवळ विकासाच्या मोठ्या घोषणा करतात पण प्रत्यक्षात काहीच साध्य होत नाही. ओसरगाव येथील टोलनाक्यावर टोलवसुली ला जनतेतून आणि विरोधी पक्षातून विरोध झाला. मागील टोलवसुली ठेकेदार कंपनीत मंत्री नितेश राणे पार्टनर होते असा आरोपही उपरकर यांनी केला.

error: Content is protected !!