कणकवली नगरपंचायत चा भोंगळ कारभार
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरभर आज सायंकाळी पडलेल्या अर्ध्या तासाच्या पावसात माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांच्या घरासमोरील रस्त्यावर चिखलच चिखल झाला. मान्सूनपूर्व गटारसफाई पूर्ण झाल्याच्या दाव्याची पोलखोल रस्त्यावर झालेल्या चिखलाने केली आहे. नगरपंचायत इमारतीलगत पटकीदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर माजी नगरसेविका राजश्री धुमाळे यांचे घर आहे. धुमाळे यांच्या घरासमोर रस्त्यालगत गटाराची सफाई करण्यात आली. मात्र गटारसफाई केल्यानंतर सगळाचा कचरा, साचलेली गाळयुक्त माती गटारालगत रस्त्यावरच ठेवण्यात आली होती. त्यामुळे आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पडलेल्या पावसात हा रस्ता पूर्णतः चिखलमय झाला होता. या भागातून रस्त्यावरून चालणेही नागरिकांना मुश्किल झाले आहे. नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ गटारसफाई नंतर रस्त्यावर ठेवलेली माती हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.












