ग्रामपंचायत फोंडाघाट वर्धापन दिन उत्साहात साजरा !

दाखला वितरण उपक्रम सह श्री सत्यनारायण पूजा संपन्न !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वर्धापन दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध कामांसाठी आवश्यक असलेले दाखले व उत्पन्न प्रमाणपत्रे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याचे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना दाखले काढण्यासाठी कणकवली येथे जाण्याची गरज भासली नाही व त्यांच्या वेळेची तसेच खर्चाची बचत झाली.

या अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या दाखल्यांचे वितरण ग्रामपंचायत फोंडाघाट छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. संजना आग्रे, उपसरपंच सौ. तन्वी मोदी, ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस, ग्रामपंचायत सदस्य सायली तेली, स्नेहलता पांचाळ, राजश्री नानचे, प्रितम भोगले तसेच सोसायटी चेअरमन राजन नानचे उपस्थित होते. याचप्रमाणे मोठ्या संख्येने दाखलाधारक ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी राजेश्वरी जोईल, मनीषा चव्हाण, प्रज्ञा सामंत शुभम सावंत व निमिष सावंत यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामपंचायत प्रशासनामार्फत करण्यात आले.तहसीलदार श्री.दिशांत देशपांडे यांनी सदर दाखले तात्काळ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.

सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा व महाप्रसाद सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य,कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली.

error: Content is protected !!