मुंबई येथे कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस चौक नामफलकाचे ३ जून रोजी अनावरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कामगारांचे कैवारी, बंद सम्राट, ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी रेल्वे मंत्री, कोकण रेल्वेचे सहशील्पकार आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री पद्मविभूषण साथी जॉर्ज फर्नांडिस यांना अभिवादन करणारा विशेष सोहळा अर्थात त्याच्या नावे बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या ‘ए’ विभागातील एका चौकास जॉर्ज फर्नांडिस यांचे नाव देण्यात येणार असून या नामफलकाचे अनावरण कार्यक्रम दि. ३ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदुर युनियन चे अध्यक्ष अशोक जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

मुंबई महानगर पालिकेच्या ‘ए’ विभागातील वालचंद हिराचंद मार्ग आणि डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग यांच्या छेद बिंदूवरील चौकाचे साथी “जॉर्ज फर्नांडिस चौक” असे नामकरण बुधवार दि. ३ जून रोजी स.११.०० वा. करण्यात येणार असून या कार्यक्रमाला पालकमंत्री आशिष शेलार,उपमहापौर संजय घाडी,महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, आमदार प्रवीण दरेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सभागृह नेते गणेश खणकर, प्रभाग समिती अध्यक्ष ज्ञानराज निकम, यशवंत किल्लेदार आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुंबई म्युन्सिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कवीसकर, इंजिनियर्स असोसिएशनचे रमेश भुतेकर – देशमुख,नर्सिंग आणि पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या सरचिटणीस श्रीम.त्रिशाला कांबळे यांनी संयुक्तिक दिली.
नामफलकाचे अनावरण झाल्यानंतर साथी जॉर्ज फर्नांडिस यांचे सहकारी समाजवादी चळवळीतील प्रमुख नेते आणि कामगार यांच्या वतीने साथी जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्याची व विचारांची स्मृती जाग्या करण्यासाठी म्युनिसिपल मजदुर युनियनचे कार्यालय करी रोड येथे विशेष सभेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

जॉर्ज फर्नांडिस

error: Content is protected !!