दिनेश तथा दया भोगटे यांची सेवा नवोदितांना मार्गदर्शक– सहकारी कृष्णा/भाई राणे
दिनेश भोगटे यांचा प्रशासन व सहकार्यांतर्फे हृद्य सत्कार
फोंडाघाट (प्रतिनिधी) : प्रवाशांना दिलेली सेवा आणि प्रशासनाशी सहकार्य यामुळे दिनेश भोगटे यांनी परिवहन सेवेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या सेवेमुळे,आजचा त्यांचा सत्कार आनंद व प्रेरणा देणारा आहे. असे गौरवोद्गार कणकवली आगार व्यवस्थापक अजय गायकवाड यांनी काढले. एसटी महामंडळातील यशस्वी सेवेबद्दल दिनेश तथा दया दिवाकर भोगटे यांचा सत्कार नुकताच कणकवली येथे पार पडला.
यावेळी वाहतूक नियंत्रक सुनील तांबे, हरिश्चंद्र जाधव, चालक अजित राणे,स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, सहकारी कृष्णा राणे ,भाई राणे,विनय राणे ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायकवाड व मित्रपरिवार यांचे कडून दया भोगटे- उभयतांचे श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला.
मित्रपरिवार कृष्णा राणे, भाई राणे कामगार सचिव विनय राणे यांनी दया भोगटे यांच्या कार्यतत्पर सेवेचा गौरव केला. दया भोगटे यांनी त्यांच्या सेवेमध्ये विजयदुर्ग, कणकवली, मालवण, कुडाळ,देवगड येथील स्थानकात वाहक म्हणून तर वैभववाडी, कणकवली, फोंडाघाट येथे वाहतूक नियंत्रक म्हणून यशस्वी काम केले.हे काम नवोदिकांसाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना एसटी बस प्रशासनाचे अधिकारी,कर्मचारी, चालक- वाहक आणि मायबाप प्रवाशांच्या सहकार्यामुळेच, तसेच सहनशील आणि अभ्यासपूर्ण स्वभावामुळे मी प्रत्येक वेळी यशस्वी सेवा देऊ शकलो. याबद्दल मी सदैव ऋणी राहीन असे मत व्यक्त केले. या सोहळ्याचे प्रास्ताविक-आभार- सूत्रसंचालन कृष्णा कुडतरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रशासकीय सहकारी, मित्रपरिवार, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते….












