आपला सिंधुदुर्ग

आपला सिंधुदुर्ग

सर्व सरकारी कार्यालयात मराठी बोलणे अनिर्वाय, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मराठी भाषा संवर्धनासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने…

“सहकारी संस्था उत्कर्षात कर्जदार सभासदांचा वाटा मोठा असतो”- सूर्यकांत कदम

बौद्ध समाजाच्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्ज वितरण सेवेचा प्रारंभ खारेपाटण (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात बौद्ध समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी तथागत नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात आली असून संस्थेच्या एकूण उत्कर्षात ठेवीदार सभासदा बरोबरच संस्थेच्या कर्जदार सभासदाचा देखील वाटा…

आडवली मध्ये शिवजयंती उत्सवा निमित्ताने जिल्हास्तरीय खुली एकपात्री अभिनय स्पर्धा…!

आचरा (प्रतिनिधी) : आडवली येथील सनराईज शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने रात्रौ ठीक 9 वाजता जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न होणार आहे. ही स्पर्धा खुल्या वयोगटासाठी असून स्पर्धेचा विषय हा शिवकालीन/ संतकालीन…

रिक्षा संघटना तळेरेचा ३१ वा वर्धापन दिन उद्या : विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील रिक्षा संघटनेच्या ३१ साव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दि. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी तळेरे एसटी बस स्थानकासमोर विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, १० वाजता श्री पावणादेवी ढोलपथक,…

राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी विस्तार अधिकारी शत्रुघ्न दळवी यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील उपवडे येथील राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शत्रुघ्न न्हानू दळवी यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी १ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मुंबई कल्याण येथे हा हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात नेले…

भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवारपासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणार्‍या कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात मंगळवार 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्त धार्मिक व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

सिंधुदुर्ग जिल्हा नियजाेन च्या पहिल्याच बैठकीत खासदार नारायण झाले आक्रमक ; चांगले काम करा अधिकाऱ्यांना सुनावले खडेबाेल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : अखर्चित निधीवरून जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील अन्य प्रशासनाला टार्गेट करण्यात आले. २०२४-२५ चा २५० कोटींचा आराखडा असताना त्यातील प्राप्त १५५ कोटी निधीतून केवळ ३२ कोटी रुपये खर्च झाला आहे. उर्वरित निधी कधी आणि कसा खर्च केला जाणार…

मसूरे दत्तमंदिर येथे 4 पासून हरिनाम सप्ताह !

मसूरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्तमंदिर येथे ०४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी अखेर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. ०४ फेब्रुवारी सकाळी १०.०० वा.अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात व दत्त गुरुंची आरती, ०५…

राज्य युवा पुरस्कार सन २०२३-२४ साठी अर्ज करण्याचे आवाहन

तळेरे (प्रतिनिधी) : राष्ट्र व राज्य निर्माणामध्ये युवकांची महत्वपूर्ण भूमिका असून मोठ्या संख्येने युवा वर्ग / संस्था राज्यात सामाजिक कार्य करीत आहेत. युवामध्ये असलेल्या सुप्तगुणांना वाव देणे. त्यांनी केलेल्या सामाजित कार्याला प्रोत्साहन देणे, त्यांचा गुणगौरव करणे आवश्यक आहे. राज्याचे युवा…

जिल्ह्यातील 31 शाळांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते डिजिटल साहित्य वितरित

कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा आमदार निरंजन डावखरेंचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना रोजगार मुख आणि अत्याधुनिक शिक्षण मिळावे. यासाठी कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा उपक्रम आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सोलर पॅनल देण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजन मधून…

error: Content is protected !!