Category ओरोस

450 रुपयात घरगुती गॅस सिलिंडर महाराष्ट्रात का नाही?- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांचा सवाल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन दिले आहे. याला मोदींची गॅरेंटी म्हणून संपूर्ण राजस्थानात सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जर सत्ता आली तर राजस्थानात भाजप…

महा आवास अभियानात सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान

ओरोस (प्रतिनिधी) : महा आवास अभियान २०२१-२२ मध्ये राज्य पुरस्कृत आवास मध्ये सर्वोत्कृष्ट काम केल्याने राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा सन्मान करण्यात आला. मुंबई नरिमन पॉइंट येथील राज्यशासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी…

शासनाने सर्व पदे भरल्यानंतर महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल – डॉ सुनीता रामानंद

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नव्याने मंजुरी मिळालेली आहे. येथील आवश्यक पदे अद्याप भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शासनाने सर्व पदे भरल्यानंतर हे महाविद्यालय सक्षमपणे सुरू होईल. त्यावेळीच आपल्याला अपेक्षित असलेली आरोग्यसेवा मिळणार आहे, असे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता…

जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी आपल्याकडे असलेले पुरावे सादर करावेत

२१ ते २४ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे आवाहन ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सादर केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले…

गुन्ह्यात वापरलेली चारचाकी बेळगाव मधून ओरोस पोलिसांनी केली जप्त

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात वापरण्यात आलेली चारचाकी गाडी नं MH07 AG7274 ही कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर कौलापुर येथील वाघा धोंडी पाटिल यांचे शेतातून सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस हवालदार पी एस गोसावी यांच्या…

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 23 नोव्हेंबर रोजी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्गनगरीत युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे…

फळपिक विमा योजनेंतर्गत भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खाती

केंद्रीयमंत्री राणे, पालकमंत्री चव्हाण यांचे मानले आभार ओरोस (प्रतिनिधी): प्रधानमंत्री फळपीक योजनेंतर्गत भरपाईची रक्कम इन्शुरन्स कंपनींच्या माध्यमातून आजपासून शेतकऱ्यांच्या खाती जमा होणे सुरू झालेले असून यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे नेमका पाठपुरावा करणारे नारायणराव राणे आणि पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांचे…

सराईत चोरटा प्रकाश पाटीलचा जामीन अर्ज नामंजूर

अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक आणि गोवा राज्यात घरफोडी प्रकरणी ५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईत चोरटा प्रकाश विनायक पाटील याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी फेटाळून…

सेवा कर विभागाची पुनर्रचना व्हावी यासाठी राज्यव्यापी असहकाराचे आंदोलन सुरू

ओरोस (प्रतिनिधी) : वस्तू व सेवा कर “विभागाची पुनर्रचना व्हावी व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, यासाठी वस्तू व सेवा कर अधिकारी -कर्मचारी समन्वय समितीच्यावतीने 30 ऑक्टोंबर 2023 पासून राज्यव्यापी असहकाराचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आजपासून या आंदोलनाने वेगळे…

कराटे बेल्ट परीक्षेत चौके, मालवण मधील खेळाडूंचे यश

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मुवथाई थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग तर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत चौके, मालवण मधील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. ओरोस येथे ही परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये कु. लावण्या गेंड, कु.आर्या पाटकर, कु. सुमन चव्हाण,…

error: Content is protected !!