ओरोस (प्रतिनिधी) : देवगड तहसीलसार रमेश पवार यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी 19 मे रोजी काढले आहेत. रिक्त असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या तहसीलदार चैताली सावंत यांच्याकडे होता. मात्र आता 19 मे पासून देवगड तहसीलदार आर जे पवार यांच्याकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
तहसीलदार आर जे पवार यांच्याकडे जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार












