खारेपाटण येथे २३ मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : दहशत वादाच्या विरोधात शोर्य व प्राणपणाने लढून आपल्या देशाच्या सीमेचे संरक्षण करणाऱ्या व वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खारेपाटण येथे दी.२३ मे २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते व खारेपाटण माजी सरपंच श्री रमाकांत राऊत यांनी दिली.

खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण एस टी बस स्थानका पर्यंत काढण्यात येणाऱ्या या तिरंगा रॅलीत शालेय विद्यार्थी,शेतकरी, व्यवसायिक,शिक्षक,डॉक्टर,वकील, इंजिनिअर,इत्यादी सह सर्व देशप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्री रमाकांत राऊत यांनी केले आहे.

error: Content is protected !!