करूळ घाटात दरड कोसळली ; वाहतूक मात्र सुरळीत सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस अवकाळी पावसाने वैभववाडी तालुक्याला जोडपून काढले असून संततधार व सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्याच पावसाचा वैभववाडीतील दोन्ही घाटांना फटका बसला असून भुईबावडा आणि करुळ घाटात ठिकठिकाणी काही प्रमाणात दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

गेले चार दिवस सह्याद्री पट्ट्यासह तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून या अवकाळी पावसाचा सर्वानाच फटका बसला आहे. तालुक्यातील भुईबावडा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. नवीनच बांधण्यात आलेल्या वैभववाडी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील ठिकठिकाणी किरकोळ प्रमाणात दगडी पडण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र संबंधित ठेकेदाराने दरडी हटवण्यासाठी जेसीबी आणि कामगारांची टीम तयार ठेवले आहे. त्यामुळे त्याचा वाहतुकीवर कोणता परिणाम झालेला नाही. भुईबावडा घाटात सायंकाळी चारच्या दरम्यान दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते. सार्वजनिक बांधकामच्या अधिकारी कर्मचारी यांनी घाटात जाऊन जेसीबीचा सहाय्याने दगड माती हटविण्यात आली आहे.

error: Content is protected !!