सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कुडाळ येथील महावितरणचा अभियंता लाच प्रकरणात अडकल्याचे उदाहरण ताजे असतानाच कणकवली शहरातीलही एका खात्यातील अधिकारी एसीबी च्या रडारवर असल्याची जोरदार चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. अलीकडेच शहरात झालेल्या वादंगा नंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्या अधिकाऱ्याने केलेल्या ” अपेक्षे ” ची तक्रार थेट एसीबी कडे करण्यात आल्याची चर्चा आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यावर एसीबी ने बारीक लक्षही ठेवले होते. याच घटनेच्या अनुषंगाने तो अधिकारी एसीबी च्या रडारवर असल्याचे म्हटले जात आहे.
कुडाळ नंतर कणकवलीतील ही एक अधिकारी एसीबीच्या रडारवर ?












