खारेपाटण येथे तिरंगा रॅली संपन्न

ग्रामस्थांचा उस्फुर्त सहभाग

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिन्दुर च्या माध्यमातून दहशवाद्यां विरोधात लढाई करून आपली ओळख जगाला सिद्ध करून दाखवल्या नंतर भारतीय सैनिकांच्या प्रती आदर भाव व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल व धैर्य वाढविण्याच्या दृष्टीने आज खारेपाटण नागरिकांच्या वतीने भारतीय ध्वज तिरंगा रॅली सकाळी १०.३० वाजता खारेपाटण हायस्कूल ते खारेपाटण एस टी बस स्थानक पर्यंत काढण्यात आली.यामध्ये गावातील सर्व नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता.

खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण येथून या तिरंगा रॅलीला सुरवात करण्यात आली.यावेळी खारेपाटण माजी सरपंच रमाकांत राऊत,खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,सामाजिक कार्यकर्ते मंगेश गुरव,संतोष पाटणकर, रवींद्र मांजरेकर,खारेपाटण हायस्कूल चे पर्यवेक्षक संतोष राऊत,सिनियर कॉलेज खारेपाटण चे प्रा.वसीम सय्यद सर,खारेपाटण हायस्कूल लिपिक अनिल करंगुटकर चींचवली सरपंच अशोक पाटील, अरुण कर्ले,सुहास राऊत,रामा पांचाळ, डॉ.उमेश बालन, डॉ. बलराज येळकोटे,डॉ संतोष वडाम,महिला बचत गटाच्या जागृती पोटले,आस्था पाटणकर, सायली तुरळकर,पांडुरंग कोकरे, राकेश राऊत,राजू ठाकूर देसाई,आदी मान्यवर उपस्थित होते.

खारेपाटण एस टी बस स्थानक येथे नागरिकांनी भारतमाता कि जय ,वंदे मातरम् घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.तर सामूहिक राष्ट्रगीताने या तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली.शेवटी सर्वांचे आभार रमाकांत राऊत यांनी मानले.

error: Content is protected !!