शिवसेना उपनेते संजय आग्रे यांची माहिती
ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उद्यान, रोजगार हमी व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले २४ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असल्याची माहिती शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी दिली. या दौऱ्यात नामदार गोगावले विविध शासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. तसेच शिवसेना पदाधिकारी ,स्थानिक नागरिक व अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत असेही आग्रे यांनी सांगितले.












