चौके सम्यकनगर येथे मध्यरात्री घडली घटना
चौके (प्रतिनिधी) : गेले तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे चौके सम्यक नगर (चौके हायस्कूल जवळ) येथील रहिवासी श्रीमती कांचन काशीराम कदम यांच्या घराचे गुरुवार दिनांक 22 मे रोजी मध्यरात्री एका बाजूचे छप्पर कोसळून अंदाजे सुमारे 50000/- रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने त्याबाजूला घरातील कोणीही झोपत नसल्याने कुणाला दुखापत झाली नाही.
छप्पर कोसळल्याची माहिती मिळतात चौके सरपंच पी.के. चौकेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आणि तातडीने चौके तलाठी श्री गुरव आणि पोलिस पाटील रोहन चौकेकर यांना संपर्क साधून पाहणी करण्यात आली तसेच कोसळलेल्या छपराचे पंचायत यादी करण्यात आली नुकसान ग्रस्ताला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी सरपंच पी के चौकेकर यांनी केली आहे.












