वारगाव येथील रांगोळी स्पर्धेत मोठया गटात कुमारी अनुष्का नर व वैष्णवी कानकेकर प्रथम

कणकवली (प्रतिनिधी) : अनंत श्री विभूषित जगतगुरू रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज जगतगुरु रामानंदाचार्य पीठ नाणीजधाम स्व-स्वरूप संप्रदाय सेवा केंद्र समिती वाघाचीवाडी यांच्यावतीने आरती केंद्र वारगाव येथे दि.२४ मे रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती. मोठ्या गटासाठी भारतीय लोककला व भारतीय सैनिक माझा अभिमान तर लहान गटासाठी पाणी वाचवा, जीवन वाचवा या विषयावर आधारित ही रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती.

मोठया गटात कुमारी अनुष्का नर व वैष्णवी कानकेकर प्रथम तर कुमारी धनश्री कानकेकर द्वितीय व कुमारी-सानिका कुलकर्णी, तृतीय, कुमारी प्राजक्ता कुलकर्णी चतुर्थ तर लहान गटामध्ये कुमारी श्रुती तळेकर प्रथम तर श्रावणी घाडी हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दोन्ही गटात एकूण १५ स्पर्धक सहभागी होते. सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेसाठी सागर पांचाळ व दिपाली मेस्त्री यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सदर कार्यक्रमात मान्यवरांमध्ये अशोक जगताप यांनी मनोगत व्यक्त केले तर सहभागी स्पर्धकांमधून भक्ती कानकेकर व श्रुती तळेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सेवा केंद्र अध्यक्ष अशोक जगताप, भक्ती केंद्र प्रमुख विजय कुलकर्णी, चंद्रकांत कानकेकर, सुधाकर कुलकर्णी, विकास कुलकर्णी, प्रकाश मेस्त्री, कृष्णराज कानकेकर, संजना कुलकर्णी, विघ्नेश चव्हाण आदी भक्त मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक पाताडे तर प्रस्ताविक व आभार चंद्रकांत कानकेकर यांनी मानले.

error: Content is protected !!