खुल्या गटात होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी तसेच साहित्य व इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग सहभागी व्हावे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांचे आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात अनेक महान स्त्री व्यक्तिमत्त्वांनी समाजसेवेचे आणि शौर्याचे अजरामर उदाहरण निर्माण केले आहे. त्यापैकी एक महान आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. २०२५ हे अहिल्याबाई होळकर यांचे ३००वे जन्मवर्ष असून, या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वर्षाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष, वैभववाडी यांच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित तालुकास्तरिय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकार्य, धर्मकार्य आणि न्यायपूर्ण शासन यांची त्रिसूत्री अचूकपणे जपणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:
अहिल्याबाई होळकर : एक आदर्श शासिका आणि जनसेविका
किंवा शौर्य, सेवा आणि श्रद्धेचा संगम : अहिल्याबाई होळकर
वरीलपैकी कोणत्याही एका विषयावर किमान ७ ते कमाल ८ मिनिटात स्पर्धकाने आपले विचार मांडायचे आहेत. सदर स्पर्धा शनिवार दि.३१ मे २०२५ रोजी भारतीय जनता पक्ष, कार्यालय वैभववाडी येथे सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी साठी श्रद्धा रावराणे 9373345898 यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत प्रथम क्रमांकास ₹१०००/-, चषक आणि प्रमाणपत्र तर द्वितीय क्रमांक : ₹५००/-, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वैभववाडी तालुकास्तरीय स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी, अभ्यासकांनी तसेच साहित्य व इतिहासप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्ष, वैभववाडी यांच्या वतीने तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.












