करुळ घाटात डोझर घेऊन जाणाऱ्या कंटेनरने घेतला पेट

आगीत कंटेनर जळून खाक तर डोझरचे नुकसान; सुदैवाने जिवितहानी टळली

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात आज सकाळी गगनबावड्यापासून काही अंतरावर असतानाच कोल्हापूरच्या दिशेने डोझर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर ने अचानक पेट घेतला या आगीत कंटेनर आणि त्यातील डोझर मशीन पूर्णपणे जळून खाक झाले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट आहे आगीची माहिती मिळता ठेकेदार वेल्हाळ यांनी तातडीने घटनास्थळी पाण्याचे टँकर पाठवले शिवाय घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सुदैवाने दुर्घटनेत कंटेनर चालक थोडक्यात बचावला मात्र कंटेनर आणि त्यातील डोझर मशीनचे मोठे नुकसान झाले आहे.

error: Content is protected !!