वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले काही दिवस पावसाची संततधार आहे. मंगळवारी पहाटेपासून तर तालुक्याला मुसळधार झोडपून काढले. या पावसाने वैभववाडी शहरातील गटारांच्या पाण्याने अक्षरशः दैना उडवली. अ. रा. विद्यालया समोर गटारचे पाणी पूर्णपणे रस्त्यावर आल्यामुळे वाहचालक व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मग नगरपंचायत प्रशासनाने जेसिबिच्या साहाय्याने गटर उपसून पाण्याला वाट करून दिली. तर एस टी. बस स्थानक नजीक आलिकडेच बांधकाम केलेले गटरात तलावासारखे पाणी साचले होते. मुसळधार पडणाऱ्या पावसाने वैभववाडी शहरातील गटाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दत्त मंदिर ते संभाजी चौक दरम्यान नगरपंच्यावतीने सुमारे ५५ लाख रुपये खर्च करून गटर बांधले आहे. मात्र या गटारातून पावसाचे पाणीच जात नव्हते. त्यामुळे शहरात ठीक ठिकाणी पाणी दुकान, हॉटेल समोर पाणी साचले होते. अखेर सोमवारी नगरपंचायतीने या सिमेंट काँक्रीटच्या गटाराला होल पाडून रस्त्यावरील पाणी गटारात सोडण्याची उपायोजना केली. मात्र संभाजी चौकाच्या पुढे पक्के गटर नसल्यामुळे गेल्या वर्षी तात्पुरते खणून तयार केलेले गटर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सुरू असलेल्या शहरातील रस्त्याच्या कामामुळे हे गटर बुजवले गेले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने गटाराचे सर्व पाणी रस्त्यावर येऊन पूर्ण दैना झाली होती. त्यानंतर नगरपंचायतीने धावाधाव करून जेसीबी च्या साह्याने हे गटार उपसून पाणी मार्गाला लावले. जे काम करताना वैभववाडी नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे मुख्याधिकारी श्री थोरात बांधकाम सभापती रणजीत तावडे सुनीलराव राणे तसेच शिवसेना उभाता सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके आधी उपस्थित होते. या कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता अतुल शिवनावर सुद्धा उपस्थित होते. तसेच वैभववाडी सुख नदी येथील पुलाचे काम सुरू असून याठिकाणी चिखल झाला असून वाहन चालकांना या चिखलातून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे..
वैभववाडीत मुसळधार पाऊस… शहरात गटाराचे पाणी रस्त्यावर












