कासार्डे माध्यमिक विद्यालयात योगाच्या बहारदार प्रात्यक्षिकांनी जागतिक योग दिन उत्साहात साजरा

तळेरे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ११ वा  जागतिक योग दिन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार योग प्रात्यक्षिके सादर करून साजरा करण्यात आला . याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक एस.व्ही. राणे ,क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व योग शिक्षिका श्रीम.प्रियंका सुतार व इतर सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रात्यक्षिकामध्ये प्रशालेतील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी प्रकाश तिर्लोटकर उपस्थित होते.

प्रारंभी प्रास्ताविकात प्रशालेचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी योगाचे महत्त्व विशद करताना योग ही भारताने जगाला दिलेली देणगी असून तब्बल १९० देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात असल्याचे गौरवोद्गार काढले तर प्रशालेचे पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानवी जीवनात योगाचे महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्यांनी नियमित योग करून शारीरिकदृष्ट्या निरोगी, मानसिकदृष्ट्या स्थिर आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ बनण्याचे आवाहन केले. तर योग शिक्षिका प्रियंका सुतार यांनी योगाचा सराव केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संयम, शिस्त, सहकार्य,सहिष्णुता यासारखे मूल्ये जोपासण्यास मदत होत असल्याचे आवर्जून सांगितले.

याप्रसंगी प्रशालेतील कु.आदर्श जाधव,ध्रुव शेट्ये,विराज पवार,वृषाल निकम,कल्पेश निकम,मयुर हडशी,अमोल जाधव, दुर्वास पवार ,शुभम राठोड व किशोर देवासी आदी योगा खेळाडुंनी विविध योगासनाची मनमोहक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व योग मार्गदर्शक श्रीम.प्रियंका सुतार यांनी केले.दरम्यान संस्था पदाधिकारी प्रकाश तिर्लोटकर, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे व प्रशालेतील सर्व शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानेताडासन,

पर्वतासन,वृक्षासन,त्रिकोनासन,तिर्यक ताडासन

 या सारखी अनेक आसने आणि प्राणायाम करून जागतिक योग दिनानिमित्ताने ‘नियमित योग करा आणि निरोगी राहण्याचा संदेश दिला.

error: Content is protected !!