खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

“स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून अधिकारी बणा”–कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे  मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांच्या यश कॉम्प्युटर अकॅडमी च्या वतीने खारेपाटण तरळे विभागातील इयत्ता दहावी व बारावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ नुकताच खारेपाटण हायस्कूल येथे कणकवलीत तालुका पोलिस निरीक्षक श्री जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यश कॉम्प्युटर अकॅडमी दरवर्षी हा उपक्रम आयोजित करते संस्थेचे हे २३ वे वर्ष असून खारेपाटण विभागातील खारेपाटण शेर्पे,वारगाव तसेच देवगड येथील कोर्ले – धालवली हायस्कूल येथील दहावीत प्रथम आलेल्या व खारेपाटण प्र ल पाटील ज्युनिअर कॉलेज मधील आर्ट्स कॉमर्स व सायन्स, +२ मध्ये प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवचिन्ह व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला कणकवली पोलिस निरीक्षक  जगताप साहेब, संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, मुख्याध्यापक श्री सानप सर,  विभाग प्रमुख  गुरू शिंदे, संचालक योगेश गोडवे,शहर प्रमुख श्री सुहास राऊत पर्यवेक्षक श्री राऊत सर, श्री वरुणकर सर उपस्थित होते.

“यावेळी प्रमुख मार्गदर्शक पी आय जगताप  यांनी विद्यार्थ्यांना एम् पी एस सी व यु पी एस सी सारख्या स्पर्धा परीक्षा साठी कठोर मेहनत घेऊन प्रशासकीय अधिकारी बाणा.असे आवाहन केले.” 

दहावी बारावी नंतरच्या करिअर दिशा या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केलं.या कार्यक्रमाला विभागातील विद्यार्थ्यांनी व पालक  मोठ्या संखे उपस्थित होते. कार्यक्रमच सूत्रसंचालन श्री वरुणकर सर तर प्रास्ताविक आणि आभार कार्यक्रमाचे संयोजक मंगेश गुरव यांनी मानले.

error: Content is protected !!