चौके (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे येथील इयत्ता पाचवीतील कु. शंकर विलास सरनाईक याने गणित प्रज्ञा परीक्षा उत्तीर्ण होऊन दैदिप्यमान यश मिळवले आहे. शंकर सरनाईक याची गणित प्रज्ञा परीक्षेत सिल्वर कॅटेगरी प्रमाणपत्र धारक म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाचे शालेय व्यवस्थापन समिती कुणकवळे, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, सर्व ग्रामस्थ कुणकवळे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
शंकर विलास सरनाईक याचे गणित प्रज्ञा परीक्षेत यश












