देवगड (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पडेल मंडल मधील सर्व गावांतील ग्रामदेवताना एकाच वेळी सोमवार 23 जून रोजी सकाळी 8 वाजता अभिषेक करण्यात येणार आहे. नामदार नितेश राणे हे मंत्री झाल्यानंतर त्यांचा पहिलाच वाढदिवस 23 जून रोजी साजरा होत आहे. आपल्या हक्काचा पालकमंत्री आणि आपल्या हक्काचे राज्यसरकार आणि केंद्रसरकार असल्यामुळे आपल्या विभागाचा आणि जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास आता तेजगतीने होणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांचा मंत्रिपदाचा कार्यकाल यशस्वी होऊन त्याना दीर्घायुरारोग्य लाभण्यासाठी ग्रामदेवताना अभिषेक करून साकडे घालण्यात येणार आहे. यासाठी चे नियोजन मंडल अध्यक्ष महेश नारकर यांच्या सह पडेल मंडल मधील सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदेवताना अभिषेक












