खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज खारेपाटण या शिक्षण संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरण करणे कामाचा शुभारंभ आज गुरुवार २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी खारेपाटण येथील दानशूर व्यक्तिमत्व व श्री देव कालभैरव – दुर्गादेवी मंदिर खारेपाटण ट्रस्ट चे अध्यक्ष मधुकर शेठ गुरव यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.
यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव – महेश कोळसुलकर,संचालक विजय देसाई,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्थेचे संचालक डॉ. ए.डी कांबळे,खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य संजय सानप,पर्यवेशक संतोष राऊत,प.पू.भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संतोष पाटणकर,नंदकिशोर कोरगावकर,संकेत शेट्ये,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष दयानंद कोकाटे,युवा मीकार्यकर्ते संकेत लोकरे,भूषण कोळसुलकर,पंकज कोळसुलकर, पप्पू रायबागकर,प्रशालेचे शिक्षक हरयाण सर,शिंदे सर, गुरव सर आदी मान्यवर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
खारेपाटण हायस्कूलच्या नूतन प्रवेशद्वार सुशोभीकरण करणे कामाला सुमारे ७ लाख रुपये एवढा खर्च येणार असून या कामासाठी मधुकर शेठ गुरव यांनी सुमारे २ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे.यांबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी त्याचे आभार व्यक्त केले.













