सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील घरांचे आकर्षक पर्याय एकाच छताखाली
मुंबई (प्रतिनिधी) : क्रेडाई सिंधुदुर्ग आयोजित “कोकण प्रॉपर्टी प्रदर्शन 2026” हे भव्य वास्तू प्रदर्शन दिनांक 3, 4 व 5 एप्रिल रोजी दादर येथील क्रीडा भवन मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. कोकणातील प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
या प्रदर्शनात 25 हून अधिक नामांकित बिल्डर्स,1 हजार पेक्षा जास्त प्लॉट्स, 250 हून अधिक बंगलोज, तसेच शॉप्स, ऑफिसेस आणि 400 हून जास्त N.A. प्लॉट्स यांचे विविध पर्याय उपलब्ध असणार आहेत. 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता
पालकमंत्री नितेश राणे (मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य)यांच्या हस्ते उदघाटन होणार असून यावेळी क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे, तसेच रसिक चौहान – ज्येष्ठ कार्यकारी सदस्य, क्रेडाई महाराष्ट्र, विद्यानंद बेडेकर – उपाध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र, सुरेंद्र भोईटे – खजिनदार, क्रेडाई महाराष्ट्र
शहाजी पाटील – सह. सचिव, क्रेडाई महाराष्ट्र, दशरथ शेट्ये – सह. खजिनदार, क्रेडाई महाराष्ट्र यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
मुंबईभर मोठ्या प्रमाणावर होर्डिंग्ज, रेल्वे ब्रँडिंग व ऑन-ग्राउंड प्रमोशनद्वारे या प्रदर्शनाची जोरदार प्रसिद्धी करण्यात आली असून, नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
कोकणातील प्रॉपर्टी मार्केटला मोठे व्यासपीठ
या प्रदर्शनामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रॉपर्टींना मुंबईतील ग्राहकांपर्यंत थेट पोहोच मिळणार आहे.मुंबईतील सर्व ग्राहकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची संधी घ्यावी, असे आवाहन क्रेडाई सिंधुदुर्गतर्फे गजानन कांदाळगावकर (अध्यक्ष),अभिजित जैतापकर (सचिव)
अनिल साखळकर (खजिनदार)यांनी केले आहे.












