सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका अल्पवयीन मतिमंद मुलीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील नराधम सीताराम धुलोजी खरात ( वय 45, रा गोठस, ता कुडाळ ) याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायाधीश श्रीमती व्ही एस देशमुख यांनी फेटाळून लावला. जामीन अर्ज नामंजूर झाल्यामुळे आरोपी खरात चा जेलमुक्काम वाढला आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. लिंगपिसाट आरोपी सीताराम धुलोजी खरात याने मतिमंद असलेल्या अल्पवयीन पीडितेच्या घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्या घरात घुसला आणि पीडितेवर शारीरिक अत्याचार केला. पिडीतेची आई बाहेरून घरात येत असलेली पाहून आरोपी नराधम खरात याने स्वतःच्या मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पळ काढला होता. याबाबत पीडित युवतीच्या आईने कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ही घटना 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी घडली होती. आरोपीविरोधात फिर्याद दाखल होताच तात्काळ 6 डिसेंबर रोजी
फिर्यादीनुसार आरोपी सीताराम धुलोजी खरात याच्यावर पोक्सो तसेच खरात याच्यावर पोक्सो सह बी एन एस च्या कलमानुसार बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करून त्याला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती. दरम्यान सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या खरात याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी अर्ज सादर केला होता. विशेष जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सुनावणीदरम्यान आरोपी खरात च्या जामीन अर्जाला अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी जोरदार हरकत घेत पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पीडित अल्पवयीन युवती ही 65 टक्के मतिमंद असून हा गंभीर गुन्हा आहे. पीडिता ही अल्पवयीन आणि मतिमंद असल्याचे माहीत असूनही आरोपीने तिच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असून पीडिता अद्याप घाबरलेल्या मन:स्थितीत आहे, जामीन मिळाल्यास आरोपी पीडितेला गाठून तिच्या जीवाला धोका पोचवू शकतो, सदर गुन्हा मागे घेण्यासाठी अथवा साक्ष बदलण्यासाठी पीडितेवर दबाव टाकू शकतो,साक्षीदार आणि फिर्यादीवर आरोपी दबाव आणू शकतो, आरोपीला कायद्याचे भय नाही त्यामुळे तो आणखी गंभीर गुन्हे करू शकतो. अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी आरोपी खरात चा जामीन नामंजूर होण्यासाठी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी आरोपी सीताराम खरात चा जामीन अर्ज फेटाळून त्याची रवानगी जेलमध्ये केली आहे.












