कृष्णराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कोकण व प. महाराष्ट्र युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष बैठक संपन्न

सिंधुदुर्ग युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांनी कृष्णराज महाडिक यांची सदिच्छा भेट घेत दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच कोल्हापूर येथील कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर येथील भाजपा कार्यालयात कोकण आणि प. महाराष्ट्र विभागातील युवा मोर्चा जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला सिंधुदुर्ग भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री उपस्थित होते. महाडिक कुटुंबातील युवा नेतृत्व असलेल्या कृष्णराज यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे भाजपा युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. भाजपा सिंधुदुर्ग युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी थेट कोल्हापूर गाठत युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची सदिच्छा भेट घेत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष पुजारे, कणकवली शहर मंडल अध्यक्ष सर्वेश दळवी, ग्रामीण मंडळ अध्यक्ष अण्णा खाडये, कणकवली शहराध्यक्ष सागर राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!