खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील प.पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खारेपाटण या संस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकताच सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन च्या वतीने आंबोली सैनिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पतसंस्थेच्या अधिवेशनात माजी शालेय शिक्षण मंत्री व विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांचे दोन दिवसीय अधिवेशन -२०२६ नुकतेच अबोली, ता. सावंतवाडी येथील सैनिक स्कूल येथे दि.२३ व २४ मे २०२६ रोजी फेडरेशनचे अध्यक्ष सुनील राऊळ यांच्या अध्यक्षेखाली संपन्न झाले. यावेळी जिल्ह्यातील सुमारे १५० सहकारी संस्थांचे अध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शाखा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील काही महत्वाच्या उत्कृष्ट कार्य केलेल्या संस्थाचा आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने गौरव करण्यात आला. यामध्ये खारेपाटण येथील प. पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचा समावेश होता.
या कार्यक्रमाला माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा सहकारी फेडरेशनचे कार्याध्यक्ष जॉय डॉन्टस, व्यवस्थापक महेश कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. तर या अधिवेशनात मार्गदर्शक म्हणून मन्सूर अत्तार, ऍडव्होकेट श्री पटवर्धन (रत्नागिरी) जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक सोपान शिंदे, तर मार्गदर्शक म्हणून आर. बी. यादव (पुणे), सायबर विभाग सिंधुदुर्ग च्या पोलिस निकिता परब, अशोक देशमुख (पुणे)आदी प्रमुख अधिकारी वर्ग उपस्थित होते. या सत्कार समारंभ प्रसंगी खारेपाटण पतसंस्थेचे अध्यक्ष नसीरभाई काझी, उपाध्यक्ष राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक प्रवीण लोकरे, संतोष पाटणकर, श्रध्दा देसाई, संतोष हर्याण, नंदकिशोर कोरगावकर, राजेश वारंगे, राजेंद्र वरुणकर, मनस्वी कोळसुलकर, भावेश कर्ले, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे, खारेपाटण शाखाधिकारी गणेश जामसंडेकर, कणकवली शाखाधिकारी श्री बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. तर खारेपाटण येथील प. पुज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल संस्थेला मिळालेल्या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


आंबोली, ता.सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पतसंस्थांच्या अधिवेशनात खारेपाटण येथील प. पूज्य भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करताना आमदार दीपक केसरकर,अध्यक्ष सुनील राऊळ व मान्यवर.












