खारेपाटण महाविद्यालयाचा बी. ए. निकाल ९३ टक्के

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील के. पी. एस. पी. एम. संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या बी. ए. परीक्षेचा निकाल नुकताच मुंबई विद्यापीठाने जाहीर केला असून महाविद्यालयाचा ९३ टक्के इतका उल्लेखनीय निकाल प्राप्त केला आहे. या परीक्षेत कु. माधवी सुनील शेंगाळे हिने ७४.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु. सूरज सुरेश तावडे यांनी ६९.८३ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक संपादन केला, तसेच कु. अमित अनंत कदम यांनी ६८.६६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शेठ लोकरे, व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आत्माराम कांबळे, कला शाखा समन्वयक प्रा. रश्मी देसाई, परीक्षा व मूल्यमापन विभागप्रमुख प्रा. प्रणय माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रथम क्रमांक माधवी शेंगाळे ७४.५० टक्के

द्वितीय क्रमांक सूरज तावडे ६९.८३ टक्के

तृतीय क्रमांक अमित कदम ६८.६६ टक्के

error: Content is protected !!