श्री स्वामी समर्थांच्या नामात जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ!

कोल्हापूर येथील श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरण सोहळ्यात श्री वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे भावोद्गार

कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन झाला सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : नामस्मरणातून मनःशांती, आत्मबल आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. स्वामींच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी ठेवली तर प्रत्येक भक्ताच्या जीवनात चमत्कार घडतात, कारण श्री स्वामी समर्थांच्या नामात जीवनातील संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आहे असे भावोद्गार अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी काढले. अधिक मासाच्या पवित्र पर्वाच्या निमीत्ताने कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने आंबेवाडी कोल्हापूर येथील दत्त समर्थ सांस्कृतिक भवन येथे हजारो भाविकांच्या उत्स्फुर्त सहभागाने श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण सोहळा अत्यंत भक्तीमय, उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात नुकतच संपन्न झाला. या वेळी कोल्हापूर वासीय स्वामी भक्त यांची निस्सीम स्वामी भक्ती व या नामस्मरण सोहळ्यास संबोधीत करताना नगरसेवक महेश इंगळे यांनी वरील भावोद्गार काढले. या वेळी चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांचा इच्छापूर्ती पदयात्रा सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष सुहास पाटील व सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम यांच्या हस्ते श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानातील महेश इंगळे कुटूंबियांच्या पिढीजात स्वामी सेवेप्रित्यर्थ महेश इंगळे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित भक्तांकडून महेश इंगळे यांचे औक्षण करून फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आले. सुहास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाची सुरुवात महेश इंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, उद्योजक नितीन वाडीकर, कृपासिंधु चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटील, करवीर पंचायत समितीचे सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित हजारो भाविकांच्या वतीने अखंड नामजप, टाळ-मृदुंगाचा निनाद, स्वामी भक्तांची प्रचंड गर्दी आणि श्री स्वामी समर्थ या जयघोषाने परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला होता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागली होती. या कार्यक्रमात कोल्हापूर व परिसरात सामाजिक, सेवाभावी आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी भक्तांचा प्रमुख पाहुणे महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पदयात्रेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांनी महेश इंगळे यांची सभागृहात प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत महेश इंगळे यांनी अक्कलकोट येथील वटवृक्ष देवस्थानाचे महत्त्व, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीला, नामस्मरणाची शक्ती आणि भक्तीमधील सातत्य याविषयी अत्यंत हृदयस्पर्शी मार्गदर्शन केले. यानंतर महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाच्या वतीने नामजप सोहळा संपन्न झाला. नामजपाने उपस्थित हजारो स्वामी भक्त मंत्रमुग्ध झाले. भक्तांनी एकचित्ताने स्वामी नामाचा जप करत परिसर अध्यात्मिक ऊर्जेने भारून टाकला.

टाळ, मृदुंग आणि विणेच्या सुरेल साथीने वातावरण अधिकच भक्तिमय बनले. महिलांनी व पुरुषांनी भजनाच्या तालावर भक्तिभावाने नृत्याचा ठेका धरत स्वामी नामात तल्लीन होऊन आनंदोत्सव साजरा केला, शेवटी महेश इंगळे आणि सुहास पाटील यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याकार्यक्रमामुळे कोल्हापूर परिसरात भक्ती, सेवा आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाचे नियोजन चोपदार नारायण यादव, मनोज माने, रमेश माने, वेणू सुतार, यशवंत चव्हाण आदींनी केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यजित कदम, रविंद्र पाटील, महेश मालक इंगळे मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर सर, अंकुश केत, ज्ञानेश्वर भोसले, सागर गोंडाळ, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, सुनील पवार, सोमनाथ सुतार, सागर गोंडाळ, श्रीकांत झिपरे, मनोज जगताप सर, विश्वनाथ देवरमनी सर, कुमार हत्तुरे, कलशेट्टी सर, विद्याधर गुरव सर, रमेश शिंदे सर, सुनिल पवार, काका सुतार, सुरेश वाले सर, ओमकार उटगे, स्वामीनाथ मुसळे, अमर पाटील, संदीप पंडीत, नामदेव माने आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!