वारगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मुंबई येथे यशस्वीरित्या संपन्न

जोगेश्वरी पूर्व चे आमदार अनंत उर्फ बाळा नर यांची विशेष उपस्थिती.

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारगाव या गावातील मुंबई स्थित युवकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने याच माध्यमातून गावचा विकास करण्याच्या हेतूने प्रथमच युवा मित्र मंडळ वारगाव या मंडळाच्या वतीने मुंबई येथे दि.२४ मे २०२६ रोजी वारगाव प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.तर या क्रिकेट स्पर्धेला जोगेश्वरी पूर्व मतदार संघाचे आमदार अनंत उर्फ बाळा नर यांची विशेष उपस्थिती होती.

मुंबई,भायखळा येथील राणीबाग मैदान येथे संपन्न झालेल्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वारगाव गावचे युवा कार्यकर्ते निखिल वळंजू, आशिष कोकाटे,सिद्धांत केसरकर यांनी केले होते.तर या स्पर्धेकरिता खास गावाहून तळेरे पंचायत समिती सदस्य राजेश जाधव, वारगाव सरपंच नाना शेट्ये, माजी सरपंच एकनाथ कोकाटे,ग्रा.पं.सदस्य प्रमोद केसरकर, यांसह समाजसेविका सुचिता प्रभू व समाजसेवक गणेश धावडे तसेच वाडी प्रतिनिधी मंगेश पावजे,अभिषेक पेटकुलकर, सुजित मांडवकर,सिद्धेश धावडे, प्रकाश धनावडे,समीर शेट्ये,नितेश कुलकर्णी,अवधूत काणकेकर, समीर राणे,सूर्यकांत सावंत,हर्षद केसरकर,तसेच वारगाव ग्रामस्थ सदा कानकेकर,कृष्णराज कानकेकर,महेश धुमक,विकास कुलकर्णी,प्रमोद पांगरेकर,नारायण राऊत,दिलीप कानकेकर,बाबू शेट्ये
शंकर केसरकर,हरिश्चंद्र केसरकर, पंढरीनाथ पेटुलकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुंबई सारख्या धावपळीच्या व धकधकीच्या शहरात वारगाव मुंबई स्थित युवकांच्या १४ संघानी सहभाग घेऊन मुंबई महानगरात आपल्या गावाची एकजूट कायम असल्याचे या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दाखवून दिली.तर या स्पर्धेमध्ये वारगाव पवारवाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावत ८८८८/- रुपयाचे पारितोषिक व आकर्षक चषक प्राप्त केला.व गावठणवाडी संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त करून ६६६६/- रुपये पारितोषिक व चषक मिळविला.तसेच नरवाडी संघाने तृतीय क्रमांक प्राप्त करत २२२२/- रुपये व चषक मिळविला.व उत्तेजनार्थ म्हणून मांडवकरवाडी संघाला २२२२/- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तर शिस्तबद्ध संघ म्हणून धावडेवाडी संघाला गौरविण्यात आले.

तसेच उत्कृष्ट गोलंदाज – निशांत घाडी,उत्कृष्ट फलंदाज – सचिन सावंत,मालिकावीर – सोमेश कानकेकर,उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – महेश कानकेकर आदी खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेला प्रोस्थाहन देण्यासाठी आमदार बाळा नर व वारगाव गावचे रहिवासी व पं.स.सदस्य राजेश जाधव,सरपंच नाना शेट्ये माजी सरपंच एकनाथ कोकाटे यांची विशेष उपस्थित होती.

error: Content is protected !!