खारेपाटण हायस्कूल ची NCC कॅडेट कु.राधा ठाकूरदेसाई हिची बेस्ट कॅडेट म्हणून निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : ओरोस, जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग येथे ११ मे ते २० मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ५८ – महाराष्ट्र NCC सिंधुदुर्गच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालयाची विद्यार्थिनी कु. राधा राजन ठाकूरदेसाई हिची “बेस्ट कॅडेट” म्हणून निवड करण्यात आली. तर शिबिरात सहभागी झालेल्या तब्बल ४५० कॅडेट्समधून तिची ही निवड झाल्याने परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कु. राधा ठाकुरदेसाई हीने शिबिरा दरम्यान ड्रिल,फायरिंग व शिस्त,सामान्यज्ञान तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या या सर्वांगीण उत्कृष्ट प्रदर्शनाची दखल घेत तिला “बेस्ट कॅडेट” हा बहुमान नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी कमांडिंग ऑफिसर अजय राजसेखर यांच्या हस्ते ॲडम ऑफिसर तनुज मंडलिक, सुभेदार मेजर प्रभाकर कुलदीपकर तसेच ट्रेनिंग JCO सुभेदार हितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत राधाला गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. कु. राधा ठाकुरदेसाईच्या या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त व प्रशालेचे प्राचार्य संजय सानप व पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी तिचे अभिनंदन करून तिला तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तर खारेपाटण हायस्कूल एन. सी. सी. विभागाचे प्रमुख रामदास कापसे सर यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले आहे.

error: Content is protected !!