जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांची शब्दपूर्ती

मुस्लिम बांधवाना बकरी ईद पूर्वी स्वखर्चाने दिली स्ट्रीटलाईट

कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद निवडणूक प्रचारात नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील मुस्लिम बांधवाना दिलेला शब्द जि प सदस्य संतोष पारकर यांनी पूर्ण केला असून नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथील अपूर्ण असलेले स्ट्रीटलाईट चे काम बकरी ईद पूर्वीच स्वखर्चाने पूर्ण करून मुस्लिम वाडीतील रस्ता दिव्यांच्या उजेडात प्रकाशमय केला आहे. नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथे बरेच वर्ष स्ट्रीट लाईट चे काम अपूर्ण होते. निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्य जैबा नावलेकर यांनी भाजपा महायुती चे उमेदवार संतोष पारकर यांच्या निदर्शनाला ही बाब आणून दिली होती. निवडणुक प्रचारादरम्यान संतोष पारकर यांनी आश्वासन दिले होते की, स्ट्रीट लाईट चे काम स्वखर्चाने काम पूर्ण करून देईन. जिल्हा परिषद निवडणूक जिंकल्यानंतर जि. प. सदस्य संतोष पारकर यांनी मुस्लिम बांधवाना दिलेला शब्द पाळत स्ट्रीट लाईटचे काम पूर्ण केले. अस्लम पाटणकर घर ते रसूल पाटणकर घरापर्यंत 4 पोल वरील लाईन आणि बल्ब उपलब्ध करून देत स्वखर्चाने स्ट्रीटलाईट सुविधा बकरी ईद पूर्वी उपलब्ध करून दिली. पारकर यांनी एक प्रकारे मुस्लिम बांधवांची ईद गोड केली. बकरी ईद निमित्त संतोष पारकर यांनी नांदगाव येथे मुस्लिम बांधवांची ईदनिमित्त भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने मुस्लिम बांधवांकडून जिल्हा परिषद सदस्य संतोष पारकर यांचे आभार मानून सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका सरचिटणीस पंढरीनाथ वायंगणकर, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, नांदगाव ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, यासिर मास्के, तोसिम नावलेकर, समीर नावलेकर, कासम पाटणकर, आमिर नावलेकर, नझरूद्दिन पाटणकर नियाज पाटणकर आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!